किटाळ

लेखक – लक्ष्मण माने

पुस्तक परिचय / समीक्षा

समीक्षक: आरव राऊत, वर्ग 11, जवाहर नवोदय विद्यालय, अमरावती (महाराष्ट्र)

माझी बोर्डाची परीक्षा सुरू असताना मी ‘किटाळ’ हे पुस्तक परीक्षा संपल्यावर वाचण्याचे ठरवले. ‘किटाळ’ हे मी वाचलेले, लक्ष्मण माने या विख्यात लेखकाद्वारे लिहिले गेलेले दुसरे पुस्तक आहे. मी या पुस्तकाबद्दल माझ्या एका मित्राकडून अगोदरच ऐकले होते. या पुस्तकात लक्ष्मण माने यांच्यावर सहा महिलांनी बलात्काराचे गंभीर आरोप लावले होते. हे ऐकून मला आश्चर्य झाले. त्यांनी त्यांच्या अतिशय त्रासदायक अनुभवांबद्दल लिहिले आहे. त्यांचे अर्धे आयुष्य निघाल्यावर त्यांच्या संस्थानातल्याच सहा बायांनी त्यांच्यावर असे घाणेरडे आरोप लावून त्यांना बदनाम करण्याचा अटोकाट प्रयास केला होता, खरं तर त्या बदनामीच्या मागे संस्थानातलेच काही लोक होते जे त्यांच्या पराभवाची आतुरतेने वाट पाहत होते. एका जगप्रसिद्ध विख्यात लेखकावर गंभीर आरोप लागलेले ऐकून, पहिले तर मी हादरलोच पण नंतर त्या गोष्टीबद्दल मला कुतूहल वाटायला लागले. हे झालं तर झालं कसं, असा मी विचार करू लागलो. हे पुस्तक वाचण्याची सुरुवात मी माझी परीक्षा संपल्यावर दोन दिवसांच्या आत केली.

लेखकांनी त्यांच्या कथेचा आरंभ त्यांच्या त्या फोन कॉलपासून केला जेव्हा त्यांना माहीत पडले की त्यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप लावला आहे. ही गोष्ट ऐकून त्यांची घाबरगुंडीच उडाली, त्यांच्या पायाखालची जणू जमीनच सरकली. त्यांच्या डोळ्यांपुढे भलतेच चित्र येऊ लागले. त्यांच्या बायको शशीने त्यांना धीर दिला तेव्हा कुठे ते भानावर आले. बातमी ऐकल्यावर त्यांनी सर्वांच्या नजरेआड कुठेतरी लपून राहण्याचा निर्णय घेतला, ते काही दिवस त्यांच्या विश्वासू मित्राच्या घरी आले. तिथे आल्यावर त्या निर्दोष लेखकावर एकानंतर एक संपूर्ण सहा बलात्काराचे आरोप लावले गेले. या गोष्टी ऐकल्यामुळे त्यांच्या मनात सतत युक्तिवाद चालत राहायचा-

ते सतत स्वतःला एकच एक प्रश्न विचारायचे की काय आपल्या संविधानात बायांना दिलेली अफाट स्वतंत्रता आणि त्यांच्यासाठी सुविधाजनक बनवले गेलेले कायदे-कानून हे बरे आहे का? त्या दरम्यान ते सतत या विषयाबद्दल त्यांच्या मनातली मळमळ व्यक्त करत राहायचे.

त्यांच्या मस्तकात विचारांचा जणू चक्रव्यूह सुरू होता. बायांना अंधपणे दिलेले हक्क एका सभ्य आणि निर्दोष माणसावर एका वादळासारखे कसे बरसू शकतात आणि त्याच्या सुखी संतुष्ट जीवनाचे कसे वाटुळे करू शकतात, हे त्यांना आता सहजपणे कळून राहिले होते.

त्या काही दिवसांच्या काळात लक्ष्मण मानेंना एवढे तर कळाले होते की या षडयंत्रामागे कोणाचे हात असू शकणार. त्यांच्या संस्थेमध्ये त्यांच्यापासून जळणारे काही शिक्षक होते ज्यांना लक्ष्मण मानेंचे वेगवान यश पचत नव्हते. त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा सखोलपणे विचार केला आणि काही नावे त्यांच्यापुढे आली पण त्यावेळी ते काही करू नाही शकले कारण ते निशस्त्र होते. त्यांनी एक विचार केला की ज्याने पण हा कट साधण्यात मदत केली असेल त्याला माझ्या आयुष्याचे वाटुळे पाहायचे असेल, पण त्यालाच जबाब म्हणून मी जर या व्यूहरचनेतून संघर्ष करून यशस्वीपणे बाहेर निघालो तर हाच त्यांचा पराभव असेल. त्यांनी हा विचार करून पहिले त्यांच्या कुटुंबियांना भेटायचे आणि मग स्वतःहून पोलिसांच्या हिरासतीत जायचे असे ठरवले. काही दिवसांनी ते त्यांच्या कुटुंबियांना भेटायला गेले व पोलिसांच्या ताब्यात गेले.

त्यांची जेलची पहिली रात्र अविस्मरणीय होती. त्यांना जेलमध्ये नाना प्रकारचे व्यक्तिमत्त्व भेटले. त्यांना त्या जेलच्या कठोर भिंतींमधल्या काळ्याभोर अंधारात डास आणि पिसवांना तोंड द्यावे लागले. त्यांना अनेकदा अंधारकोठडीत सुद्धा ठेवण्यात आले. त्यांना कसे ते जेलचे दिवस त्यांच्या पोराने दिलेल्या ओडोमासच्या डबीने काढावे लागले, हे त्यांनाच माहीत. तिथे त्यांना एक गुन्हेगार व्यक्ती भेटला जो त्यांना ओळखायचा आणि त्यांचा खूप आदर पण करायचा. त्या व्यक्तीचा पोलिसांना धाक असायचा, त्याच्यामुळे तो असेपर्यंत मानेसाहेबांना जेलच्या आत खूप सोयी लाभल्या. त्यांनी जेलमध्ये असताना भरपूर साहित्य वाचून काढले. काही पोलीस हवालदार त्यांना ओळखायचे आणि त्यांच्यासोबत मानाचा व्यवहार करायचे पण काही हवालदार त्यांना बाकी कैद्यांसारखेच वागवायचे, त्यांच्यावर गलिच्छ भाषेचा वापर करायचे, त्यांच्यावर शिवीगाळ करायचे. त्यांनी ते सर्व अत्याचार शांतपणे सहन केले, त्यांना त्यांच्या देशाच्या कायद्यावर विश्वास होता की त्यांची सुटका नक्कीच होणार. मानेसाहेबांनी त्यांचा हा अविस्मरणीय आणि अवर्णनीय जेलचा अनुभव अगदी सोप्या भाषेत तटस्थपणे या पुस्तकात लिहिला आहे.

जेव्हा पण ते इस्पितळात तपासणीसाठी जायचे त्यांना कोणीतरी नक्कीच ओळखायचे, लोक त्यांनी लिहिलेले मराठी पाठ्यपुस्तकातले धडे वाचून मोठे झाले होते. त्यांचे सर्व स्नेही त्यांना म्हणत असत “मानेसाहेब, तुम्ही या किटाळातून नक्कीच सुटाल”. त्यांच्या आयुष्यातील या अनुभवातून त्यांना एवढे तर कळले होते की सर्वच पोलीस सारखे नसतात; कोणी त्यांना मानाचा मुजरा करायचा, तर कोणी एखाद्या कुत्र्याला हाकलावं तशा घाणेरड्या शिव्या हासडायचा. जिथे त्या महिलांनुसार त्यांचा बलात्कार झाला होता त्या-त्या स्थळांवर लक्ष्मण माने यांना अनेकदा जावे लागले. त्या स्थळांची तपासणी केल्यावर असे उघडकीस आले की त्या महिलांचे जवळपास सर्व दावे खोटे आहेत.

अखेर पोलिसांना त्यांनी केलेली तपासणी, त्यांनी रेकॉर्ड केलेले जबाब, त्यांना मिळालेले पुरावे व घटनास्थळाची छायाचित्रे, सर्व कोर्टात प्रस्तुत करावे लागले. त्यांच्या पेशी सुरू झाल्या आणि त्या बराच काळ लांबल्या. त्यांनी त्यांचा कोर्टातला अनुभव गमतीदारपणे पुस्तकात मांडला आहे. त्यांना एक महिला न्यायाधीश लाभल्या होत्या. त्यांनी या खटल्यासंबंधी सर्व पुरावे, जबाब आणि साक्ष ऐकली आणि एका निर्णयावर आल्या की लक्ष्मण माने यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप पूर्णपणे बेबुनियाद आहेत आणि त्यांची सर्व आरोपांतून सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. अखेर त्यांना बेल मिळाली.

ते जिंकले, त्यांना या युद्धात विजय प्राप्त झाला. त्यांनी त्या सर्व लोकांची तोंडे बंद पाडली ज्यांना त्यांच्या जीवनाचे वाटुळे होताना पाहायचे होते. अखेर त्यांच्यासोबत या महासंकटात शेवटपर्यंत राहणाऱ्या त्यांच्या सर्व कुटुंबीयांचे ते आभार व्यक्त करतात. कोर्टकचेरीच्या शंभर हात लांब राहणाऱ्या त्यांच्या प्राध्यापक मुलांचे ते आभार मानतात कारण काही नसताना त्यांनी पैसे गोळा करून, वकील करून त्यांच्या निर्दोष बापाला या संकटातून बाहेर काढले. अखेर ते त्यांच्या धर्मपत्नीचे आभार व्यक्त करतात कारण त्यांनी शेवटपर्यंत विश्वास न सोडता मानेंचा हात नाही सोडला.

हे पुस्तक समाजाच्या त्या संपूर्ण घटकासाठी एक धडा ठरेल, जो महिलांना दिलेले स्वातंत्र्य आणि त्यांच्या संरक्षणासाठी असलेले अनुकूल कायदे या सर्वांचा गैरवापर करून एखाद्या साध्या आणि निर्दोष व्यक्तीची फसवणूक करतो आणि त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करतो. अशा प्रवृत्तींना कडक शिक्षा देण्यासाठी भारतीय राज्यघटना, न्यायव्यवस्था आणि कायदे आजही तितकेच सक्षम आहेत, याचे हे पुस्तक एक जिवंत उदाहरण आहे.

हे पुस्तक ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने प्रकाशित केले असून, याची किंमत ३२० रुपये आहे.

Published by aaravraut

मैं अमरावती (महाराष्ट्र) से आरव राउत हूं। मै शुरू से ही एक प्रिंट-समृद्ध वातावरण में बड़ा हुआ, यही कारण था कि पढ़ने और लिखने की दिशा में मेरी प्रवृत्ति विकसित हुई। मेरी मातृभाषा मराठी है। हिंदी दूसरी भाषा है, जिसे मैंने दिल्ली में सुनना और अध्ययन करना शुरू किया जब मेरे पिता महाराष्ट्र से दिल्ली स्थानांतरित हो गए, मैं उस समय केवल 6 वर्ष का था। डायरी के ये पृष्ठ इस अर्थ में बहुत खास हैं क्योंकि यह मेरे द्वारा कक्षा 2 से ही लिखें गए है। मैं एजुकेशन मिरर का सबसे छोटा लेखक हूं जो एक ऑनलाइन शिक्षा संगठन है। जब मेरी दो डायरियाँ प्रकाशित हुईं, तो मैं दूसरी कक्षा में पढ़ रहा था। मैं हिंदी, मराठी के साथ ही अंग्रेजी भाषा में भी लिखता हूं। मुझे यात्रा करना, किताबें पढ़ना और नए विचारों पर काम करना पसंद है। घर पर, मुझे हमेशा अपने मन की बात लिखने की आजादी थी, मैं कभी भी उपदेशक बातें लिखने के लिए मजबूर नहीं था। यही कारण था कि मैंने जल्द ही पढ़ना और लिखना सीख लिया। बचपन में, मैंने लेखन की तकनीकी चीजों को समझा। मुझे याद है कि जब मैं कक्षा 1 (संत मैथ्यूज पब्लिक स्कूल, पश्चिम विहार, दिल्ली) में पढ़ रहा था, तब से मैंने लिखना शुरू किया। पहली बार मैंने 5 अप्रैल 2017 को लिखा था और तब से मैंने कई विषयों पर लिखा और मैंने अपने लेखन के सभी पृष्ठों को संजोकर रखा है। मेरे लेखन की यात्रा के दौरान, मुझे कभी भी किसी भी गलती के लिए बाधित नहीं किया गया था, मेरे माता-पिता चाहते थे कि मैं किसी भी व्याकरण में फंसे बिना लिखूं। इसी बात ने मुझे लिखने के लिए प्रोत्साहित किया क्योंकि मुझे पता था कि अगर कुछ गलत हुआ तो माँ / पिता कुछ नहीं कहेंगे। मैं किसी विषय के बारे में बहुत विस्तार के साथ एक पृष्ठ या कई पृष्ठ लिखता हूं।अगर मेरे द्वारा लिखे गए विषयों को देखा जाए, तो बहुत विविधता है।cc

Leave a comment