उपरा

लेखक – लक्ष्मण गायकवाड

पुस्तक परिचय / समीक्षा

समीक्षक: आरव राऊत, वर्ग 10, जवाहर नवोदय विद्यालय, अमरावती (महाराष्ट्र)

उपरा हे मी वाचलेले लक्ष्मण माने द्वारा लिहिल्या गेलेलं पहिलं  पुस्तक आहे. या पुस्तकात लक्ष्मण माने यांनी त्यांच्या जीवनाचे आत्मचरित्रण केले आहे.

माझी या पुस्तकाची ओळख तेव्हा झाली जेव्हा मी माझ्या शाळेच्या ग्रंथालयातून ‘किटाळ’ हे  पुस्तक इश्यू केले, त्यावेळी मला या लेखकांचं नाव कळालं. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत मी त्यांच्या आत्मकथेचं नाव वाचलं तेव्हा मला उपरा या त्यांच्या आत्मकथेबद्दल माहित पडलं. मी माझ्या शाळेच्या ग्रंथपाल सरांना विचारलं की हे पुस्तक उपलब्ध आहे की नाही. त्यांनी माहित नाही असे सांगितले, त्यानंतर मी ग्रंथालयाचा संपूर्ण मराठी विभाग तपासला पण मला काही ते पुस्तक मिळालं नाही. मी माझ्या घरी विचारल्यावर कळालं की हे पुस्तक माझ्या घरीच आहे. मग मी असा निश्चय केला कि पहिले लक्ष्मण माने यांचं आत्मचरित्र वाचणार मग त्यांच्या ‘किटाळ’ सारख्या दुसऱ्या कथा.

या पुस्तकाची भाषा निराळीच आहे. लेखक लक्ष्मण माने हे भटक्या जमातीतील कैकाडी समाजाचे भाग आहे. या समाजात कोणाचीच जमीन व घरदार नसते. त्यांना त्यांचं बिऱ्हाड गाढवावर नेऊन गावोगावी फिरावं लागत होतं. त्यांचे आई-वडील, भाऊ-बहीण व त्यांचं संपूर्ण बिऱ्हाड त्यांच्या गाढवावर बसून फिरती करायचे. त्यांचं काही ठराविक ठिकाण नव्हतं. लेखकाच्या वडिलांनी त्यांना शाळेत घातलं. शाळेत जातांना त्यांच्या अंगावर फक्त शर्टच राहायचं बाकी ते नागडे राहायचे. ते प्रत्येक आठवड्याला त्यांचं स्थान बदलत होते त्यामुळे त्यांना भरपूर शाळा बदलाव्या लागल्या. ते शाळा बदलत गेले व त्यांचे मित्रही बदलत गेले. त्यांनी  मित्र बनवनच सोडून दिलं, ते फक्त शाळेत जायचे व एका ठिकाणाला जाऊन बसायचे. त्यांचे पाचवीपर्यंत असेच झटत-पटत शिक्षण झाले.

त्यांच्या घरी दर दोन दिवसांनी डुक्कर(गुन्ना) शिजायचा व त्यानंतर ते दारू प्यायचे. पाचवीपर्यंत तरी यांच्या वडिलांनी शिक्षणाचा विरोध नाही केला. त्यांच्या फिरण्याच्या सवयीमुळे त्यांना सातवीपर्यंत खूप झटावं लागलं. त्यांनी शिक्षणासाठी  एका जागी स्थायी होण्याचा निश्चय केला. तेव्हा त्यांना शिक्षण घेण्याकरीता उसंत लाभली. त्यांचे त्यावेळी खूपच जिवलग मित्र बनले व ते अखेर पर्यंत त्यांच्या सोबतीला राहिले. दहावीला त्यांचा इंग्रजी हा विषय राहिला. त्यामुळे त्यांना सहामाही  परीक्षा देऊन पास व्हावं लागलं. त्या पाच सहा मित्रांपैकी पहिल्या परीक्षेत फक्त एकच विद्यार्थी पास झाला, तो कोल्हापुरच्या एका नामांकित कॉलेजमध्ये लागला. सहा महिन्यांनी त्याच्या लागोपाठ बाकीचे सुद्धा लागले. ते सर्व एकाच खोलीत रहायचे. त्यांचा तो कॉलेजचा काळ टवाळ्या करण्यात व गोऱ्या गोमट्या पोरी पाहण्यात गेला. लेखक कॉलेजमध्ये ग्रंथपाल बनुन पैसे कमवायचे. कॉलेज सुरू असतांना त्यांना एक चिठठी आली जी त्यांच्या ओळखीच्या पोरीने पाठवली होती ती लग्न करण्याच्या वयात आलेली होती, पण तिच्या जातीतिल मूलं भरपूर हुंडा मागत होते. या पत्राने त्या मित्रमंडळींना गोत्यात टाकले, त्यांनी त्या पत्राचे उत्तर दिले पण त्या  मुलीला काही समाधान नाही झालं. त्या मुलीने नारायण, जो त्याचा जीव‌लग मित्र होता त्याच्यासोबत लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला. नारायणने तो स्वीकारला आणि तिच्या सोबत लग्न केले.

लेखकाचा सुद्धा बऱ्याच मुलींवर जीव आला होता. त्यापैकी एक त्यांच्या कॉलेजमधली होती. तीने लग्नासाठी त्यांच्या जाती मुळे नकार दिला. त्यांना त्यांच्या घरमालकाच्या पोरीसोबत सुद्धा प्रेम झालं होतं, त्यांनी तिला पळवले व तिच्या सोबत आंतरजातीय लग्न केलं. या लग्नामुळे दोघांच्याही घरदाराने त्यांना सोडले आणि त्यांच्या सोबत सर्व नाते तोडले. पुढे त्यांना खूप संघर्ष करावा लागला. ते साताऱ्यात राहायला लागले आणि त्यांची  आर्थिक परिस्थिती खूप बेताची होती.

एके दिवशी लेखकाचे मामा व आत्त्या त्यांच्या घरी आले व त्यांना घेऊन जाण्याचा आग्रह केला. त्यांच्या नात्यातलं लग्न होतं त्यामुळे त्यांना तिथे हजर राहाणं अति आवश्यक होतं. ते गेले पण त्यांना तिथे गेल्यावर सर्व भावकीच्या लोकांच्या नजरांची सामना करावा लागला. जात पंचायत बसली. लेखक आरोपी होते. जातीच्या बाहेरच्या मुलीसोबत लग्न केल्यामुळे त्यांच्या घराण्याला जातीच्या बाहेर केले होते. त्यांच्या नात्यातील एकाने तोडगा सुचवला व सर्व ठीक केलं. असाच करून ते लग्न पार पाडते व वापस सातारा जाते.अशा प्रकारे लेखक पुस्तकाचे समापन करतात. 

या पुस्तकाचं प्रकाशन “ग्रंथाली” ने केले आहे. हे पुस्तक १७६ पानांचं आहे आणि याची किंमत १२५ रुपये आहे.

हे पुस्तक वाचून मला अठरा पगड जातींबद्दल भरपूर माहित पडलं, त्यांचे राहणीमान, त्यांचे खानपान आणि त्यांची शिक्षणासाठी धडपड या सर्व बाबींचा उल्लेख लेखक लक्ष्मण माने यांच्या आत्मचरित्र ‘उपरा’ यात आहे. त्यांच्या या पुस्तकाने मला शिक्षणासाठी धडपडण्यासाठी तर प्रवृत्त केलच पण त्याच सोबत त्यांच्या ‘किटाळ’ सारखे दीर्घ लेख व त्यांच्या इतर निर्मिती वाचण्यासाठी सुद्धा प्रेरित केलं. हे पुस्तक विपरीत परिस्थितीत पिछडलेल्या मानसिकतेच्या लोकांना कसं तोंड द्यायचं आणि त्यांच्या टीकांवर मात देऊन कसं जगायचं हे सुद्धा शिकवते. हे पुस्तक वाचण्याकरिता मी सर्वांनाच सुचवतो कारण हे पुस्तक तुम्हाला निश्चितच प्रेरित करेल.

Published by aaravraut

मैं अमरावती (महाराष्ट्र) से आरव राउत हूं। मै शुरू से ही एक प्रिंट-समृद्ध वातावरण में बड़ा हुआ, यही कारण था कि पढ़ने और लिखने की दिशा में मेरी प्रवृत्ति विकसित हुई। मेरी मातृभाषा मराठी है। हिंदी दूसरी भाषा है, जिसे मैंने दिल्ली में सुनना और अध्ययन करना शुरू किया जब मेरे पिता महाराष्ट्र से दिल्ली स्थानांतरित हो गए, मैं उस समय केवल 6 वर्ष का था। डायरी के ये पृष्ठ इस अर्थ में बहुत खास हैं क्योंकि यह मेरे द्वारा कक्षा 2 से ही लिखें गए है। मैं एजुकेशन मिरर का सबसे छोटा लेखक हूं जो एक ऑनलाइन शिक्षा संगठन है। जब मेरी दो डायरियाँ प्रकाशित हुईं, तो मैं दूसरी कक्षा में पढ़ रहा था। मैं हिंदी, मराठी के साथ ही अंग्रेजी भाषा में भी लिखता हूं। मुझे यात्रा करना, किताबें पढ़ना और नए विचारों पर काम करना पसंद है। घर पर, मुझे हमेशा अपने मन की बात लिखने की आजादी थी, मैं कभी भी उपदेशक बातें लिखने के लिए मजबूर नहीं था। यही कारण था कि मैंने जल्द ही पढ़ना और लिखना सीख लिया। बचपन में, मैंने लेखन की तकनीकी चीजों को समझा। मुझे याद है कि जब मैं कक्षा 1 (संत मैथ्यूज पब्लिक स्कूल, पश्चिम विहार, दिल्ली) में पढ़ रहा था, तब से मैंने लिखना शुरू किया। पहली बार मैंने 5 अप्रैल 2017 को लिखा था और तब से मैंने कई विषयों पर लिखा और मैंने अपने लेखन के सभी पृष्ठों को संजोकर रखा है। मेरे लेखन की यात्रा के दौरान, मुझे कभी भी किसी भी गलती के लिए बाधित नहीं किया गया था, मेरे माता-पिता चाहते थे कि मैं किसी भी व्याकरण में फंसे बिना लिखूं। इसी बात ने मुझे लिखने के लिए प्रोत्साहित किया क्योंकि मुझे पता था कि अगर कुछ गलत हुआ तो माँ / पिता कुछ नहीं कहेंगे। मैं किसी विषय के बारे में बहुत विस्तार के साथ एक पृष्ठ या कई पृष्ठ लिखता हूं।अगर मेरे द्वारा लिखे गए विषयों को देखा जाए, तो बहुत विविधता है।cc

One thought on “उपरा

  1. उत्कृष्ट लेखन ✍️ तुझे खूप खूप अभिनंदन बेटा असच लिहित राहा 💐💐

    Like

Leave a comment