‘उचल्या’ हे पुस्तक मी जानेवारी २०२५ मध्ये ‘जुठण’ वाचण्याच्या अगोदर वाचले होते. काही मराठी दलित आत्मकथा मी ऑक्टोबर २०२४ मध्येच वाचल्या होत्या जश्या भुरा, कोल्हाट्याचं पोर, बलुतं, पण ‘उचल्या’ या पुस्तकाचे त्या दरम्यान माझ्याकडून वाचन झालं नाही. मी जवाहर नवोदय विद्यालय झज्जर ला असताना तेथील माझे मराठी चे शिक्षक विशाल सरांनी मला हे पुस्तक सुचवलं होतं.