शाहनूर धारगड जंगल सफारीचा माझा अनुभव

मला सकाळी  ४.३० वाजता आईने उठवलं आणि मला बाथरूम मध्ये तोंड धुऊन दिले.  मी लगेच माझा शूज घातला आणि बॅग पॅक केली. शूज घातल्यावर मी सगळ्यांसोबत कॅन्टीन वर गेलो. तिथे मी सोडून सगळे जण चहा पिले. तिथे ते गाईड बोलत होते कि आपण आताच सफारीला जाऊया पण आम्हाला वाटलं कि अंधारात प्राणी नाही दिसत. म्हणून आम्ही (सुरज के पहिली किरण के साथ) निघायचं ठरवलं.  काही वेळानंतर आम्ही बाहेर गेलो.  मी पहिल्याच जिप्सी मध्ये बसलो.