झोंबी

लेखक – आनंद यादव
पुस्तक परिचय / समीक्षा
समीक्षक: आरव राऊत, वर्ग 10, जवाहर नवोदय विद्यालय, अमरावती (महाराष्ट्र)

हे पुस्तक वाचून  संपल्यावर माझ्या मनात प्रश्नांची गोळीबारी होऊ लागली. माझ्या मनात धडाधड प्रश्न येऊ लागले. मी हे पुस्तक लेखक आनंद यादव यांच्या जीवनातील बहुतेक प्रसंग असतील, या कल्पनेने वाचले. पण वाचल्यावर कळले की या पुस्तकात फक्त त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतच वर्णन आहे. मला वाटले “भुरा” सारख्याच यातसुद्धा ते स्थायी कसे झाले हे लिहिले असेल, पण वाचता वाचता याच्या विरुद्धच झाले. पुस्तकाची सुरुवात करताना माझ्या डोक्यात वाकडे-तिकडे विचार येत होते. पुस्तकाचे नाव वाचून मी त्या अर्धमेल्या माणसाची कल्पना करायचो. पण त्याची सुरुवात केल्यावर मला कळले की मी काय वाचत आहे.

झोंबी या आत्मचरित्राची सुरुवात त्यांनी त्यांच्या आजोबा पासून केली. त्यांचे वडील हे एकुलते होते. त्यांच्या वडिलांचं नाव रतनू होते. लेखक त्यांच्या आईवडिलांचे तिसरे मूल आणि पहिले पोरगा होते. सुरुवातीला त्यांच्या वडिलांना त्यांना शिकवायचे होते. ते पाचवीपर्यंत शिकले आणि त्यांना शिकण्याची ओढ लागली. त्यांना शिक्षणाची एवढी गोडी लागली होती की त्यांच्या वडिलांच्या पुढील शिक्षणासाठी आक्रमक विरोध असूनही त्यांनी झटत-पटत शिक्षण घेतले. शिक्षणामुळे त्यांना पुस्तकं वाचण्याची आंतरिक ओढ लागली. ते घरातले पैसे चोरून पुस्तक विकत आणायचे. हे प्रकरण घरच्यांना माहित पडल्यावर त्यांना त्यांच्या वडिलांनी कुत्र्या मांजरासारखे लाताडले. त्यामुळे त्यांची पुस्तक  बंद झाली. पण त्यांच्यामुळे पूर्ण वर्गाला पुस्तक वाचण्याची गोडी लागली. त्यावेळेस सिनेमा भरपूर चालायचे.  एकवेळा ते सिनेमा बघायला गेले  त्यानंतर ती सवय गेलीच नाही.

शिक्षण बंद झाल्यावर त्यांनी त्यांच्या गावातील बऱ्याच वडीलधाऱ्यांना विनवणी करून त्यांच्या वडिलांना  समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. अखेरीस त्यांनी ऐकले व  त्यांचे सातवीपर्यंत शिक्षण झाले. ते सातवीच्या बोर्डात पहिले येऊन त्यांचं पेपरात नाव आले. त्यांचं शिक्षण एवढं सोपं नव्हतं त्यांना सकाळी मळ्यात काम करून तसेच शाळेकडे जावे लागे.  त्यांची परिस्थिती खूपच हलाखीची होती. त्याकाळी सातवी पास झाल्यावर शाळेत मास्तर म्हणून लागायचे, पण त्यासाठी अठरा वर्ष पूर्ण झालेली हवी होती. 

ते पूर्णपणे निराश झाले होते. त्यांना यापुढे अजून तीन वर्षे मळ्यात राहावे लागणार होते. त्यांचे वडील त्यांच्याकडून एखाद्या ढोरासारखं काम करून घ्यायचे. त्यांचं पुन्हा एकवेळा शिक्षण थांबलं. पण त्यांनी प्रयत्न करून हायस्कुल पूर्ण केले. मधात पैशाची खूप तंगी झाली.  फीचं खूप मोठं संकट आलं.  तेव्हा त्यांनी कुत्र्यासारखे  कामं केली व पैसे फेडले.  त्यांचे हायस्कुलचे शिक्षक त्यांच्यावर खूप चिडत.  त्यांना शाळेत फ्री शीप  सुद्धा नाही मिळाली.  पैश्यासाठी त्यांनी भरपूर शाळेत नकली चे  कार्यक्रम ठेवले व पैसे कमविले.  त्यांच्या वडिलांचा सतत विरोध व पैशांची तंगी यांची दुधारी तलवार त्यांच्या शिक्षणाचे नाते, धडापासून मुंडी उडवल्या गत तोडत होते.

“झोंबी” त्यांच्यानुसार “शिक्षणाची झोंबी” आहे.   “शिक्षणाची झोंबी” हे कथन पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या मतात होते.  ते वाचल्यावर मला या पुस्तकाची बहुतेक कथा समजली.

हे पुस्तक तीनशे ऐंशी पानाचं आहे आणि याला मेहता पब्लिशिंग हाऊस ने प्रकाशित केलेले आहे. या पुस्तकाची किंमत ४२० रुपये आहे.  

झोंबी हे पुस्तक वाचताना मला सुरुवातीला वेगळ्याच अपेक्षा होत्या, पण वाचत गेल्यावर त्यातील शिक्षणासाठीचा संघर्ष मनाला भिडला. आनंद यादव यांनी अनुभवलेली गरिबी, वडिलांचा विरोध आणि तरीही न हार मानणारी जिद्द मला विचार करायला लावते. हे आत्मचरित्र साधे पण प्रभावी वाटले.

Published by aaravraut

मैं अमरावती (महाराष्ट्र) से आरव राउत हूं। मै शुरू से ही एक प्रिंट-समृद्ध वातावरण में बड़ा हुआ, यही कारण था कि पढ़ने और लिखने की दिशा में मेरी प्रवृत्ति विकसित हुई। मेरी मातृभाषा मराठी है। हिंदी दूसरी भाषा है, जिसे मैंने दिल्ली में सुनना और अध्ययन करना शुरू किया जब मेरे पिता महाराष्ट्र से दिल्ली स्थानांतरित हो गए, मैं उस समय केवल 6 वर्ष का था। डायरी के ये पृष्ठ इस अर्थ में बहुत खास हैं क्योंकि यह मेरे द्वारा कक्षा 2 से ही लिखें गए है। मैं एजुकेशन मिरर का सबसे छोटा लेखक हूं जो एक ऑनलाइन शिक्षा संगठन है। जब मेरी दो डायरियाँ प्रकाशित हुईं, तो मैं दूसरी कक्षा में पढ़ रहा था। मैं हिंदी, मराठी के साथ ही अंग्रेजी भाषा में भी लिखता हूं। मुझे यात्रा करना, किताबें पढ़ना और नए विचारों पर काम करना पसंद है। घर पर, मुझे हमेशा अपने मन की बात लिखने की आजादी थी, मैं कभी भी उपदेशक बातें लिखने के लिए मजबूर नहीं था। यही कारण था कि मैंने जल्द ही पढ़ना और लिखना सीख लिया। बचपन में, मैंने लेखन की तकनीकी चीजों को समझा। मुझे याद है कि जब मैं कक्षा 1 (संत मैथ्यूज पब्लिक स्कूल, पश्चिम विहार, दिल्ली) में पढ़ रहा था, तब से मैंने लिखना शुरू किया। पहली बार मैंने 5 अप्रैल 2017 को लिखा था और तब से मैंने कई विषयों पर लिखा और मैंने अपने लेखन के सभी पृष्ठों को संजोकर रखा है। मेरे लेखन की यात्रा के दौरान, मुझे कभी भी किसी भी गलती के लिए बाधित नहीं किया गया था, मेरे माता-पिता चाहते थे कि मैं किसी भी व्याकरण में फंसे बिना लिखूं। इसी बात ने मुझे लिखने के लिए प्रोत्साहित किया क्योंकि मुझे पता था कि अगर कुछ गलत हुआ तो माँ / पिता कुछ नहीं कहेंगे। मैं किसी विषय के बारे में बहुत विस्तार के साथ एक पृष्ठ या कई पृष्ठ लिखता हूं।अगर मेरे द्वारा लिखे गए विषयों को देखा जाए, तो बहुत विविधता है।cc

2 thoughts on “झोंबी

Leave a comment