लेखक – साने गुरुजी
पुस्तक परिचय/ समीक्षा
समीक्षक: आरव राऊत, वर्ग 10, जवाहर नवोदय विद्यालय, अमरावती (महाराष्ट्र)

हे पुस्तक मी फेब्रुवारी २०२५ मध्ये वाचले होते, हे माझं नववी च्या वर्षाचं अखेरचं पुस्तक होतं. त्या काळात मी इंग्रजी मधील एनिड ब्लीटनची फेमस फाईव्ह नावाची एकवीस पुस्तकांची शृंखला वाचून राहिलो होतो. हे पुस्तक माझ्या शाळेच्या पुस्तकालया मध्ये होतं, माझ्या बऱ्याच मित्रांनी हे पुस्तक वाचले होते. सर्व म्हणत होते हे पुस्तक खूप छान आहे. मग मी सुद्धा हे पुस्तक वाचायला घेतलं. मला हे पुस्तक लवकरच संपवायचं होतं कारण आमच्या परीक्षा जवळ येऊन राहिल्या होत्या. या पुस्तकाचे लेखक पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी आहे. या पुस्तकात एकंदरीत तीन मुलांची एक अत्यंत भावुक व प्रेमळ कथा आहे. अगोदर मी या गोष्टीचे वर्णन करतो व नंतर माझे या पुस्तका बद्दल मत मांडतो.
या पुस्तकाची सुरुवात साने गुरुजी एका गावाच्या ओळखीपासून करतात. ते गाव म्हणजे ‘सारंग’ गाव. त्या गावात गलबतांचे येणे जाणे सुरु राहायचे कारण ते गाव समुद्र काठी स्थित असते. त्या गावात बरेच नारळाचे झाडं व वाळूचा एक भला मोठा समुद्र किनारा असतो. त्या गावात दोन मुले राहायची. एक मुलगा ज्याचे नाव मंगा होते व दुसरी मुलगी जिचे नाव मधुरी होते. दोघेही समुद्र काठी वाळूचा किल्ला बनवत होते पण तो काही बनत नव्हता. बरेच प्रयत्न केल्या नंतर एक मुलगा आला ज्याचे नाव बुधा होते, त्याने किल्ला बनवण्यात यांची मदद केली. मग त्यांची ओळखी पाळखी झाली व त्यांनी स्वतः बद्दल सांगणे सुरु केले. मंगा हा गरीब घरचा मुलगा होता जो गावात एका झोपडीत राहत होता. मधुरी सुद्धा मंगा सारखीच, पण बुधा हा एका श्रीमंत बापाचा एकुलता एक मुलगा असतो, तो समुद्र काठावरच्या एका भल्या मोठ्या बंगल्यात राहत होता.
असेच हि तीन मुले सोबत वाढते व मोठे होते. बुधा व मंगा दोघांचेहि प्रेम मधुरीवर होते व मधुरी चे ही दोघांवर प्रेम होते. पण तिचे मंगा वर जरा जास्त प्रेम होते म्हणून तिने तीचे घर सोडून मंगा सोबत राहणे सुरु केले. मंगाने सुद्धा घर सोडले होते. दोघेही समुद्रा जवळच्या टेकडीवर भेटले व एक मोठा निर्णय घेतला. त्यांच्या जवळ क्षुल्लक भर ही पैसे नव्हते म्हणून त्यांनी बुधा जवळून पैसे उसने घेतले. बुधा हा एकटा राहत होता त्याचे आई वडील वारले होते. बुधा चे दुःख त्यांना पाहावेनासे झाले होते. बुधा अत्यंत दुखी राहायचा त्याच्या आई वडिलांना त्याची काळजी पडली होती. त्याचा एकच ध्यास होता मधुरी. तो दिवसभर मधुरी! मधुरी! करायचा. त्याने मधुरी च्या आठवणीत तिचे खूप सारे चित्र काढले होते. त्याने त्याच्या आई वडीलांना लग्नासाठी विचारले. त्याच्या पालकांना खूप आनंद झाला. बुधाने जेव्हा मुलीचे नाव मधुरी असे सांगितले तेव्हा त्याच्या पालकांना दुःख झालं ते दोघे अचंबित होते, एका मजुराच्या मुली सोबत त्यांचा मुलगा प्रेम करतो पण तरीही ते त्यांच्या लेकराच्या खुशी साठी निसंकोच मुलीच्या वडिलांना भेटायला गेले. मधुरी च्या वडिलांनी त्यांना नकार दिला व मधुरी ला सुद्धा श्रीमंत घरी नाही जावे वाटे, बुधाचे मन कोसळले, त्याने स्वतःला कोंडून घेतलं होतं. हे बुधाच्या पालकांना काही सहन नाही झाले व ते दोघेही देवाघरी गेले.
बुधा जवळून पैसे घेऊन मधुरी व मंगा ने एक झोपडी घेतली आणि त्यांनी त्यांच्या संसाराला सुरुवात केली. त्यांना तीन मुले झाली पण पैशांची काही सोय लागेना म्हणून मंगाने गलबतावर बसून विदेशात जाऊन पैसे कमवायचे याचा हट्ट धरला. मधुरीने लाख प्रयत्न करून त्याला अडविले पण तो काही ऐकेना. मंगा सर्व तयारीनिशी गेला.
किनाऱ्यावर अशी बातमी पसरली कि मंगाचे गलबत वादळात अडकले व बुडाले. लोकांनी असं गृहीत धरलं कि गलबतावर बसलेले सर्व लोकं बुडाले. हि बातमी ऐकताच मधुरीचे काळीज चटकन तुटले. तिला काही कळून नव्हते राहिले होते. तिने स्वतःला आवरलं कारण तिच्या जवळ दुसरा पर्याय नव्हता. तिच्या घरात तिला सोडून तिचे तीन मुलेच होती. तीचं चौथं मूल जन्म घेताच वारलं होतं. मग बुधा तिच्या आयुष्यात शिरला. बुधा ने तिला आधार दिला. बुधा तिला सांभाळतो हे पाहून मधुरी ला बरं वाटलं. मधुरीला त्याच्या मुळे खूप मदत झाली. पुढे जाऊन बुधा व मधुरी सोबत राहायला लागते.
वास्तवात मंगा मरत नसतो, तो पोहत-पोहत एका देशाच्या किनारी पोहचतो. त्याला तिथचा राज कैदीत ठेवतो. त्याने राजाला भरपूर विनवण्या केल्या, राजाचा खूप मान केला. राजाच्या पोरीला मंगा वर प्रेम आले होते. ती मंगा वर जीवापार प्रेम करत होती. पण मंगाला त्याच्या बायको व मुलांशिवाय काहीच दिसत नव्हतं. तिने राजाला विनवले व मंगा ला कैदेतून मुक्त केले. राजाने त्याला नाव दिली. तो नावेत बसून निघतो. राजकन्या त्या नावेतच असते पण ती त्या नावेतल्या खोलीत राहते. मंगा जेव्हा झोपतो तेव्हा ती बाहेर येऊन त्याला मन भरून पाहून, समुद्राकडे झेप घेते व बुडून जाते. तिच्या प्रेमाने तिला वेडं करून दिलं होतं.
मंगा त्या नावेत बसून स्वदेशी आला. पण त्याने कोणाला स्वतःची खरी ओळख दिली नाही. तो एक मुसाफिर आहे म्हणून सर्वांना सांगतो. तो त्याच्या झोपळीवर जातो पण त्याला तिथे काही सापळत नाही. तो समुद्र किनारी येऊन बसतो त्याला बुधा व मधुरी, चार-पाच मुलांसह दिसतात त्यातले तीन त्याचे व मधुरी चे मुलं असतात. त्याला धक्का लागला, तो अचंबित झाला, त्याला काही कळेनासे झाले. तो त्याच्या ओळखीच्या आजी जवळ जातो व तिला सर्व हकीकत सांगतो. ती मंगा ला शांत करते, त्याला ताप येत असतो त्याला जगण्याचा काही उद्देश्य नाही दिसत होता. दुसऱ्या दिवशी बुधा व मधुरी त्याला भेटायला येतात. मधुरी व बुधा ला खूप वाईट वाटते. मंगा त्या दोघांना आशीर्वाद देतो व तो नेहमीसाठी डोळे मिटून घेतो.
ही गोष्ट मानवी प्रेमाची आहे ज्यात एक मुलगी एका मुलावर प्रेम करते पण तो गेल्यावर दुसऱ्या मुलावर प्रेम करते, मग पहिला वापस येतो व दोघांना आशीर्वाद देऊन देवाघरी जातो. साने गुरुजींनी हि गोष्ट अतिशय भावनात्मक रीतीने लिहिली आहे. यात मानवी जीवनातील खरे व अफाट प्रेमाचे दर्शन होते. हे पुस्तक वाचता वाचता माझ्या डोळ्यात पाणी आले होते, माझे मन भिन्नावले होते. कदाचित साने गुरुजींचं माझं हे पहिलं पुस्तक होतं म्हणून मला नवल वाटले. पुढे यांना सुद्धा वाचणार.
अप्रतिम आरव
LikeLike
खूप खूप छान
LikeLike
अप्रतिम
LikeLike
खूप खूप छान आरव… पुस्तक वाचण्याचा उत्साह निर्माण झाला..
LikeLike
Nice Aarav keep it up 🎉🎉🥳
LikeLike
खूप खूप छान आरव … पुस्तक वाचण्याचा उत्साह मनामध्ये निर्माण झाला.
LikeLike