शाहनूर धारगड जंगल सफारीचा माझा अनुभव

एके दिवशी अचानक बाबाने मला म्हटलं कि ट्रेकिंग ला चलशील का ? मी म्हटलं हो. मग बाबाने मला कुठे  जायचं आहे हे  सांगितले. तिथे आम्ही ट्रेकिंग करायला नाही जाणार आम्ही तिथे एक किल्ला पहायला जाणार आहे ज्याचे नाव नरनाळा किल्ला असे आहे. अशी माहिती मला बाबाने सांगितलि होती.  तिथे आई पण येणार होती. आम्ही तिथे १६ जानेवारीला जाणार  होतो आणि १७ जानेवारीला वापस येणार होतो. मग आम्ही तयारी करायला सुरुवात केली. जाण्याच्या आदल्या दिवशी मी आईसोबत बॅगची चेन बरोबर करायला गेलो होतो. चेन बरोबर करून झाल्यावर आम्ही प्रवासा मध्ये खाण्यासाठी खूप काही खाण्याच सामान घेतल.  तिथे आम्ही दुपारी जाणार होतो म्हणून बाबाने ट्युशन सकाळी ठेवली.  ट्युशन झाल्यानंतर मी आंघोळ केली आणि कपडे घातले.  आईने माझ्यासाठी तिकडे जाण्यासाठी दोन नवीन सॉक्स च्या जोड्या आणल्या होत्या.  मी पूर्णपणे तयार झालो आणि गाडीची वाट पाहत बसलो पण गाडी थोडीशी लेट झाली.  ती गाडी दोन वाजता येणार होती पण काही कारणाने त्यांना थोडासा उशीर झाला.  मग आम्ही गाडीत बसलो.  रस्त्यात आम्हाला खूप कॉलेजेस दिसले.  काही वेळानंतर आम्ही फार्म हाऊस  जवळ आलो.  तिथे दुसरी गाडी पण आली होती.

त्या जागेवर  मी दुसऱ्या गाडीत बसलो.   ज्या गाडीत मी बसलो होतो ती गाडी खूप मोठी होती. ती गाडी सुशील काकाने आणली होती.  त्या गाडीत सुशील काका आणि दोन तीन जण बसले होते.  मी त्यांची ओळख करून घेतली.  एका दादाचं नाव होतं प्रज्वल दादा, एका ताईचं नाव होतं राधिका ताई, एका ताईचं  नाव होतं नंदिनी ताई, आणि एका ताईचं नाव होत सई ताई.  आधी मी समोरच्या सीटवर बसलो पण मला पाठीमागे बसावं लागलं कारण राधिका ताईला गाणे लावायचे होते.  काही वेळानंतर मी माझ्या खाण्याच्या सामानामधून एक वस्तू काढली ते होते केक चे पिसेस म्हणजे ति पेस्ट्री नाही ते ब्रिटानिया केकचे पिसेस होते.  ते खाल्ल्या नंतर मी एक आणखीन एक पॅकेट काढलं.  त्यामध्ये एक रोल होता आणि त्या रोल मध्ये पिघडलेली चॉकलेट होती. जेव्हा मी ते खाल्ल, तेव्हा ते मला एवढं छान वाटलं एवढं छान वाटलं कि मी तुम्हाला सांगू नाही शकत.  मी गाडीत सगळंच नाही खाल्ल फक्त हे दोन पॅकेटच खाल्ले.  मला करायला काहीच नव्हतं म्हणून मी झोपलो.   उठल्या नंतर काही वेळ मी असाच बसला राहिलो.  काही वेळानंतर आम्ही एका धाब्यावर पोहोचलो.  आई आणि बाबा जे दुसऱ्या गाडीत बसून आले होते ते पण पोहोचले होते.  तिथे मी एक कचोरी खाल्ली आणि एक कप चहा पण पिलो.  मग आम्ही तिथून निघालो.  मी बाहेर पाहतच होतो कि रस्त्यावर मला एक बोर्ड दिसलं ज्याच्यावर लिहिले होते कि – दर्यापूर सीमा समाप्त.  खूप वेळानंतर आम्ही दोन्हीही  गाड्या एका जागेवर थांबवल्या . तेव्हा तिथे संध्याकाळ झाली होती.  तिथे आम्ही काही वेळ थांबलो. तिथे फक्त पहाडच पहाड दिसत होते.  मग आम्ही गाडीत बसलो. जेव्हा गाडी चालू केली आम्ही एक मिनिटाच्या आत त्या जागेवर  पोहोचलो.  आई आणि बाबा ज्यांच्या गाडीत बसले होते त्यांचं नाव कुमेल दादा आणि मुफद्द्ल दादा आहे.   कुमेल दादाने सगळ्यांच सामान गाडीच्या डिक्कीमधून काढलं. काही वेळानंतर आम्ही त्या जागेच्या अंदर गेलो

आम्हाला समोर जाता जाता आश्चर्यच झालं कारण एन्ट्री गेट पासून रूम्स खूप दूर होत्या.  त्या रस्त्या मध्ये मधात पायऱ्या त्याच्यासमोर एक पूल आणि त्याच्यासमोर वापस काही पायऱ्या मग थोडसं समोर गेलं कि रूम्स.  आम्ही आमची रूम शोधत होतो पहिले आम्हाला ‘धनेश’ नावाची रूम दिसली पण ती लॉक होती.  म्हणून आम्हाला वाटलं कि ती आमचीच रूम आहे.  हि शंका दूर करण्यासाठी  आम्ही त्या रूमच्या लॉकला आमच्या जवळची चाबी लावून पाहिली आणि ती रूम उघडली.  त्या रूम मध्ये एकावर एक बेड होते बिलकुल नवोदय सारखे जे मी एकदा व्हिडीयोत बघितले होते. मला ते बेड खूब आवडले.  आम्ही एका बेडवर सगळ्यांच्या बॅग्स ठेवल्या. मी माझा बेड ठरवून घेतला कि मी कुठे झोपणार.  तिथे एकच बाथरूम आहे असे मला वाटले, पण तिथे दोन बाथरूम होते.  त्यातला एक बाथरूम खूप कॉर्नरला होता आणि त्याच्या समोर एक बेड पण आला होता म्हणून मला एक बाथरूम दिसला नव्हता.  ते दोन्हीही  बाथरूम खूप छान आणि स्वच्छ होते.  मग आम्ही कॅन्टीन मध्ये गेलो. तिथे मी हॅपी हॅपी बिस्कीट खाल्ले. मला माहीतच नव्हत कि तिथे चहा येणार आहे आणि जेव्हा मला हे माहित पडलं तेव्हा फक्त एकच बिस्कीट उरला होता मी तो बिस्कीट चहा सोबतच खाल्ला. चहा पिल्यानंतर मी एक आईसक्रीम खाल्ली.  मग आम्ही बाजूला फिरायला गेलो.  सगळे जण तिथे भुताच्या गोष्टी करत होते म्हणून मी मुफद्द्ल दादा च्या अंगावर एक पान टाकलं पण याने तो घाबरला नाही.  अचानक मला एका कोपऱ्यात बिबट्या दिसला पण ती मूर्तीच होती. मी त्या बिबट्यावर बसलो. मग आम्ही जेवणाचा डबा घ्यायला रूम मध्ये गेलो आणि तिथून डबा घेउन कँटीन मध्ये आलो आता संध्याकाळचे जवळपास ८ वाजले होते.  कँटीन मध्ये आम्ही जेवण केलं. जेवणानंतर मी सगळ्यांना हलवा दिला. मग आम्ही रूम मध्ये गेलो आणि तिथे डबा ठेवला. तेव्हा सुशील काका आणि मुफद्द्ल दादा झोपले कारण ते गाडी चालवून थकले होते पण त्यांना सोडून बाकी सगळे जण बाहेर फिरायला गेले.  आम्ही समोर जाऊन फोटो काढले . जिथे आम्ही फोटो काढले तिथले रूम्स (टेन्ट)  झोपडी सारखे होते आणि त्या रूम्स वर प्राण्यांचे नाव लिहिले होते.  काही वेळानंतर आम्ही एका जागेवर बसलो.  तिथे आम्ही विचार करत होतो कि काय खेळायचं?  मग मी सांगितले कि आपण नॉक नॉक चिकलेट्स हा खेळ खेळू शकतो का? जेव्हा मी हे वाक्य म्हटले तेव्हा सगळ्यांना प्रश्न पडला कि हा कोणता खेळ आहे, तेव्हा मी सांगितले कि या खेळामध्ये राज्य देणारा दुसर्यांना एक टॉपिक देतो जसे फळाचे नाव, रंगाचे नाव. टॉपिक दिल्यावर दुसरे मूल ठरवते कि तो काय बनणार.  मग सगळे मुलं सांगतात कि कोणकोणते कलर किंवा काहीपण घेतले आहे.  मग सगळे मुलं रांगेत लागतात. राज्य देणारा एकेकाला विचारतो कि तू हे आहे का, तू ते आहे का. ज्याने हो म्हटलं त्याच्या पाठीमागे राज्य देणारा धावतो आणि जर त्या मुलाने दुसऱ्याचे नाव घेतलं तर राज्य देणारा त्याला शोधतो. पण हा गेम त्यांना आवडला नाही. विचार केल्यानंतर ठिक्कर गेम खेळायचा असे ठरले.  सगळ्यांना टिक्कर हा गेम खेळायचा होता म्हणून मी आणि राधिका ताईने डब्बे आखले आणि एका टाइल ला छोटं केलं.

त्याच्यात सगळ्यात समोर बाबा होते पण एका चान्स मध्ये प्रज्वल दादा एवढा समोर गेला, एवढा समोर गेला कि त्याचा एक राऊंड कम्प्लिट झाला.  मला एकदम राग आला म्हणून मी कधी कधी जेव्हा तो टिक्कर टाकत होता,  तेव्हा मी त्याच्या मधात एक गोटा टाकत होतो ,  नाहीतर डबे लहान करत होतो.  मी खूप वेळापासून एकाच डब्यावर होतो कधी टिक्कर डब्यावर पडत नाही तर कधी टिक्कर उचलायच्या  वेळेस पडून जायचो.  पण एक वेळ आली कि मी दोन डबे समोर गेलो.  जेव्हा सुशील काका आणि मुफद्दल दादा झोपले होते तेव्हा कुमेल दादा पण झोपले होते. कुमेल दादा पहिले उठले आणि कँटीन मध्ये जाऊन त्यांनी थर्मास मध्ये चहा आणला आणि आम्हा सर्वाना दिला आता रात्रीचे १० – १०.३० वाजले असतील.  जे खेळत नव्हते त्यांना  टिक्कर हा खेळ कसा खेळायचा हे सांगितले. टिक्कर खेळ संपल्यानंतर आम्ही एका पायावर उभं राहायची मॅच लावली. मी त्या मॅच मध्ये अर्धा मिनिट पण नाही टिकलो पण राधिका ताई आणि प्रज्वल दादानि अर्धा तास एका पायावर उभं राहून दाखवलं.  आम्ही सगळे त्यांची मजा घेत होतो , मला हे पाहून खूप आश्चर्य झाला कि हे दोघं कसे अर्ध्या तासा पर्यंत एका पायावर उभं राहू शकतात. त्यांना एका पायावर उभे पाहून आम्हाला खूप मजा येत होती. अर्धा तास पर्यंत दोघेही टिकून होते , वाट बघत होते कि दुसरा केव्हा पाय टेकवेल, एकदम अटी तटीचा सामना होता, शेवटी प्रज्वल दादाने बाजी मारली. आता रात्रीचे ११-११.३० वाजले होते.  बाकी रूम्स मधले पण लोकं बाहेर होते. 

मग आम्ही डॉर्मिटरी मध्ये गेलो.  तिथे आम्ही मधात गाद्या टाकल्या आणि त्याच्यावर बसलो.  तिथे कोणी तरी उनो नावाचा गेम आणला होता. तो गेम मी खेळलो पण मला तो समजलाच नाही म्हणून मी पत्ते खेळलो. पत्त्यांमध्ये मी बाबा आणि आई दोन प्रकारचे गेम खेळलो. एक होतं सत्ती लावणी आणि दुसऱ्याच नाव मला माहित नाही.  त्या गेम मध्ये सगळ्यांना सारखे पत्ते वाटावे लागतात आणि सगळ्यांना एक एक करून पत्ते टाकावे लागतात आणि ज्याच्या आधीच्या पत्त्यावर त्याच नंबरचा पत्ता पडला जेवढे पत्ते त्याच्या खाली होते तेवढे त्याचे.  बाबाने सांगितले कि हा पत्यांमधला सगळ्यात सोपी गेम आहे.   त्या उनो गेम मध्ये मला फक्त दोनच रुल समजले होते, पहिला होता एका रंगाच्या पत्त्यावर त्याच रंगाचे पत्ते टाकू शकतो किंवा त्याच आकड्याचा पत्ता पण टाकू शकतो.  मला उनो गेम मधले काहीच न येता मी तो गेम जिंकलो आणि बाबा त्या गेम मध्ये सेकंड आले. मला तो गेम नाही आवडला कारण जो त्या गेम मध्ये जिंकतो तो त्या गेम मधून बाहेर निघून जातो. मी जिंकल्यावर तो गेम खूप वेळ चालला म्हणून बाबा आणि मी पत्ते खेळलो.  जेव्हा आम्ही अंदर आलो तेव्हा सुशील काका आणि मुफद्द्ल दादा उठले होते आणि बाहेर गेले होते.  जेव्हा आम्ही पत्ते खेळत होतो तेव्हा कोणी तरी एक केक काढला कारण कि त्यांना माहित होत कि मुफद्द्ल दादा चा बर्थ डे आहे.  तेव्हाच मुफद्द्ल दादा आला आणि आम्ही केक खाल्ला. 

नंतर सगळे जण बाहेर गेले पण मी , आई आणि बाबा रूम मधेच थांबलो. बाबाला आणि आईला झोप येत होती म्हणून थांबले आणि मी झोपण्याच्या विचाराने थांबलो. आता रात्रीचे १२.३० – १ वाजले होते.   मी माझ्या निवडलेल्या बेडवर झोपण्याच्या आधी मी आईसोबत एक पत्त्यांचा गेम खेळलो. खेळल्या नंतर मी एक 5 स्टार चॉकलेट खाल्ली

आणि बेडवर लेटलो. तिथे मला खिडकीतून बाहेर सगळे जण बसलेले दिसले.  मी त्यांना विचारलं कि मी येऊ का पण ते नाही बोलले,  पण तरीही मी तिकडे  गेलो.   तिथे ते भुताच्या गोष्टी करत होते आणि दोन तीन विडिओ पण त्यांनी पाहिले.  आम्ही लवकरच अंदर आलो.  मी अंदर येऊन बेड एक्स्चेंज केल.  तिथे सगळे जण गोष्टी करत होते आणि सुशील काका त्यांचे किल्ल्यावरचे खतरनाक अनुभव सांगत होते.  मी झोपायचा खूप प्रयत्न करत होतो पण मला झोप त्यांच्या गोष्टी पूर्ण होई पर्यंत आली नाही.  मला भीती वाटत होती म्हणून मी आई जवळ झोपलो. 

ज्याच्यात कुमेल दादा, राधिका ताई, प्रज्वल दादा आणि मुफद्दल दादा बसले होते. जेव्हा आम्ही त्या जंगलात जायच्या गेटपासून समोर गेलो तेव्हा पासून मला भीती वाटली.  मला वाटत होत कि कधी पण वाघ येऊ शकते.  तेव्हा थोडासा अंधार होता. मी अशा प्रकारची गाडी पहिल्याच वेळेस पाहली. ती गाडी पूर्ण ओपन होती .  म्हणजे त्या गाडीला वरून काहीच नव्हतं.  कारण आपल्याला पण बाहेरचे सगळ दिसलं पाहिजे.  फक्त ड्राइवर ची सीट आमच्या सीट पेक्षा खाली होती आणि पूर्ण पॅक पण होती. याचे कारण काय आहे असा मला प्रश्न पडला?  मला तिथे थोडी थंडी लागत होती कारण पूर्ण गाडी ओपन होती म्हणून मी माझ्यासमोर माझी बॅग ठेवली.  रस्त्यात गाईड ने सांगितले कि १० किलोमीटर बफर झोन आहे,  म्हणजे जिथे आपल्याला कमी प्राणी दिसणार असे गाईड सांगत होते.  तेव्हा सूर्योदय होत होता म्हणून आम्ही एका जाग्यावर गाडी थांबवायला लावली आणि सूर्योदयाचा फोटो काढला.  तेव्हा सूर्य खूप मस्त दिसत होता कारण दोन्ही बाजूला पहाड आणि त्याच्या मधात सूर्य.  मी असा नजारा फोटोत आणि व्हिडीओ शिवाय कुठेच नाही पाहिला होता.  आम्ही तिथून समोर गेलो आणि तिथे आम्हाला एक प्राणी दिसला.  गाईड ने त्या प्राण्याचं नाव सांगितले. त्या प्राण्याचे नाव होते बायसन (जंगली बैल). आम्हाला माहित होते कि पुढे जाऊन आम्ही त्या बायसन पासून खूप जवळून जाणार, कारण तो बायसन आमच्या समोरच्या रोड पासून खूप जवळ होता . तिथे आम्हाला तिथून वापस येणारे लोक दिसले . काही वेळा नंतर आम्ही जिथे तो बायसन होता तिथे गेलो पण तो बायसन थोडासा दूर गेला होता. 

मी सूर्योदयाच्या वेळे पासून एक चिप्सचा पॅकेट खाल्ला  आणि एका डब्या मधला थोडासा चिवडा खाल्ला.  एका ठिकाणावर गाईडने सांगितले कि तिथे बफर झोन संपला आहे आणि आता कोअर झोन लागला.  खूप वेळानंतर आम्ही सगळे जण एका स्टॉप वर थांबलो.  तीथे दोन्ही गाड्या थांबल्या. गाईडने म्हटले कि तुम्ही इथे उतरू शकता आम्ही बॅग घेऊन उतरलो  त्या स्टॉपच्या गेटच्या बाहेर टायर मध्ये टाकलेल्या मातीमध्ये झाड लावलं होत. मला हे नवीन वाटलं कारण मी अशाप्रकारचं फक्त बांबू गार्डन मध्ये पाहिलं  होत बाकी कुठेच नाही.  अंदर गेल्यावर आम्ही बसलो.  मी सोडून सगळे जनांनी पोहे खाल्ले .  मी बघितले एक माणूस कुत्र्याजवळ गेला आणि कुत्रा त्याला पाहून आपले दोन्ही हात वर करून हात जोडायचा प्रयत्न करत होता. मला वाटलं कि हा कुत्रा कोणीही आला तेव्हा त्याला नमस्कार करतो म्हणून मी त्या कुत्र्या जवळ गेलो पण त्या कुत्र्याने माझ्या वेळेस नमस्कार नाहीच केला पण त्याने माझ्या वेळेस काही हाव भाव पण दाखवले नाही.  खुप वेळा मी त्या कुत्र्याच्या जागेवर येन जाणं केलं पण त्याने काही हाव भाव नाहीच दाखवले.

म्हणून मी प्रज्वल दादाला बोलावलं आणि म्हटलं कि तू या कुत्राजवळ जा आणि जेव्हा प्रज्वल दादा त्या कुत्र्याजवळ जातो तेव्हा मला खूप आश्चर्य झालं कारण त्या कुत्र्याने प्रज्वल दादाला दोन नाही तर तीन वेळा नमस्कार केला.  मी बाबाला बोलावलं जेव्हा बाबा कुत्र्याच्या तीन मीटर च्या रेंज वर आले तेव्हाच कुत्रा त्याच्यावर भुंकायला लागला.  मला वाटलं कि बाबानी जे स्वेटर घातलं होत ते काळं होत,  बाबानी जी टोपी घातली होती ती पण काळी होती आणि त्यातल्या त्यात बाबा पण काळे  म्हणून त्या कुत्र्याने बाबाला पूर्णपणे काळं पाहून,  तो कुत्रा भुंकला पण काहीही असो जेव्हा पण प्रज्वल दादा त्या कुत्र्या जवळ जात होता तो कुत्रा त्याला नमस्कार करत होता मला वाटलं कि प्रज्वल दादाच्या हॅट मुळे त्या कुत्र्याने त्याला नमस्कार केला म्हणून मी ती हॅट घालून त्या कुत्रासमोर गेलो पण त्याने माझ्या समोर काहीचं  केलं नाही बाबा पण त्याच्या समोर हॅट घालून गेले पण त्याचा काहीही फायदा झाला नाही.  प्रज्वल दादाणी कुत्र्याला पार्लेजी बिस्कीट दिले.  मग मी, प्रज्वल दादा आणि राधिका ताई तिथे जे बसण्यासाठी खुर्चीच्या जागी एका गोल आकारात लाकडाचे खंबे होते आम्ही त्याच्यावर इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारत होतो त्या दोन खंब्यानमधले अंतर माझ्यासाठी खूप होते,  पहिले पहिले मला तिथून समोर जाताच नव्हतं येत पण जेव्हा मला माहित पडलं कि मी तिथून उडी मारून पण जाऊ शकतो तेव्हा पासून मला तिथून जायला काही अडचण आली नाही.

मी सुशील काकाच्या कॅमेरा वरून काही फोटो काढले.  तेव्हाच आमच्या गाईडने आम्हाला म्हटलं कि आता आपल्याला लवकर निघावं लागणार कारण कि कॉलिंग सुरु आहे.  पहिले मला प्रश्न पडला कि कॉलिंग म्हणजे काय ? नंतर मला माहित पडलं कि कॉलिंग म्हणजे एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला चेतावणी देते कि वाघ आला आहे किंवा बिबट्या आला आहे.  आमच्या काही दुरीवर एक प्राणी हॉक हॉक करत होता.  तो आवाज खूप कर्कश होता.  तेव्हाच मला एक वाघाचा आवाज ऐकू आला, मी त्यांना सांगितलं कि त्या दिशेने आवाज आला मग आम्ही  त्या दिशेला गाडी नेली आणि तिथपर्यंत नेली.  जिथे आम्ही ब्रेक घेतला तिथे  पण  काहीच  नव्हते.  मग त्याच्या नंतर मला तसा आवाज कधीच नाही आला .  मग आम्ही समोर गेलो आणि थांबलो कारण आम्हाला वाटलं कि वाघ शिकार करायला समोर गेला असणार पण तिथे काहीच नव्हतं.  आम्ही समोर जात राहिलो आणि लक्ष ठेवत राहिलो,  मी गाडीत कधी उभा राहत होतो नाही तर थकल्यावर बसत होतो.  जेव्हा गाडी हिरवेगार जंगला पासून जाते तेव्हा मी खाली बसतो कारण मला भीती वाटत होती कारण जास्तीत जास्त प्राणी हिरव्या जंगलात राहते आणि माकड पण झाडांवर राहते कधी ते जीप वर उडी मारणार किंवा कोणाच्याही अंगावर उडी मारणार आणि जेव्हा सुखे पत्ते सुखे झाड आणि जिथे ऊन पडते तेव्हा मी बिनधास्त उभा राहतो. काही वेळानंतर आम्हाला एका मैदानावर एक मोठा हरिणांचा ग्रुप दिसला, मला ते सगळे खूप छोटे दिसत होते कारण ते खूप दूर होते.  माझं लक्ष फक्त बाहेर पाहण्यातच होत कारण जेव्हा मी उठलो असतो तेव्हा मला काही वाटत नाही फक्त पाय दुखल्यावर माझ्या लक्षात येते कि, मी उठलो आणि बसलेलो असताना पण माझं लक्ष पाहण्यात असते आणि जेव्हा मला धक्का लागते तेव्हा मला माहित पडते कि मी बसलो. एकदमच कुमेल  दादाने म्हटलं गाडी थांबवा,  मग ड्राइव्हर ने गाडी थांबवली आणि जराशी पाठीमागे घेतली.  तिथे एक प्राणी होता जो केशरी रंगाचा होता आणि ज्याच्यावर काही पांढरे गोल गोल ठिपके (स्पॉट) होते.  तो प्राणी एक हरीण होता, मला वाटते तो हरीण फक्त दोन सेकंदा साठी थांबला असणार आणि तेवढ्याच वेळात  मुफद्द्ल दादा त्याचा एक फोटो पण काढू शकला नाही.   त्या दोन सेकंदात त्या हरिनाने आमच्या कडे तोंड केलं होत पण नंतर तो पळून गेला पण त्याच्या पळण्याचे फोटो निघाले.  गाईडने आम्हाला त्या हरिनाचं नाव सांगितले चौसिंगा  कारण त्याला चार शिंग होते.  मी त्या हरिनाचे शिंग लक्ष देऊन नाही पहिले म्हणून मला ते शिंग किती आहे हे बरोबर दिसलं नाही.

काही वेळानंतर मी  माझ्या बॅग मधल्या चॉकलेट खान सुरु केलं माझ्या कडे ५ किंवा ६ चॉकलेट होत्या.  मी त्यांना खुप वेळ पुरवण्या साठी सगळ्या चॉकलेट चोखून खाल्ल्या चावून नाही.  आणि एक एक चॉकलेट ५ – ५ मिनिटाने खात  होतो काही वेळाने माझ्या चॉकलेट संपल्या. कुमेल दादा आणि राधिका ताई जवळ येणाऱ्या झाडाच्या पानांना हात लावत होते म्हणून मी पण हात लावत होतो.   मी खूप वेळा पर्यंत हात लावत राहिलो सगळ्यांनी म्हटलं कि खाली बस पण मी म्हणत होतो कि मला फक्त पाच पानांना हात लाऊ द्या.   राधिका  ताईने मला म्हटलं कि चॉकलेट संपल्या वाटते?  मी हो म्हटलं मग तिने सगळ्यांना चॉकलेट दिल्या.  रस्त्यात आम्ही एका पाण्याच्या रस्त्यावर गाडी थांबवली.  तिथे मुफद्दल दादांनी फोटो काढले.  काही वेळानंतर  आम्ही ज्या जागेवरून निघालो होतो त्या गेटवर परत पोहोचलो आमच्या मागोमाग दुसरी गाडी पण आली.  तिथे मी सुशील काकाच्या कॅमेरा वरून काही फोटो काढले.  

जेव्हा आम्ही गेटच्या अंदर गेलो तिथे एका बाईचा आणि एका माणसाचा अर्धा पुतळा होता आणि त्याला डोके नव्हते.  तिथे मी, आई, बाबा आणि  नंदिनी ताईने फोटो काढले. 

मग आम्ही आमच्या रूम मध्ये गेलो सगळे जण तिथे काही वेळ झोपले आणि मी तिथे पत्ते शोधत होतो पण मला तिथे पत्ते सापडले नाही. तेव्हा राधिका ताईचा चश्मा मुफद्दल दादाने लपवला. पण नंतर तो चश्मा वापस केला.  आम्ही बॅग पॅक केली आणि रूम बंद करून बाहेर निघालो आणि कॅंटीनमध्ये गेलो.  तिथे आम्ही जेवणासाठी खूप वेळ थांबलो कारण दुसऱ्याच जेवण खुप वेळपर्यंत चाललं खूप वेळच्या प्रतिक्षे नंतर आम्हाला जेवण वाढलं.  जेवण खूप छान होत जेवणानंतर मी एक आईस्क्रीम खाल्ली.  काही वेळानंतर आम्ही बाहेर निघालो आणि गाडीत बसलो . मग आम्ही शहानुर डॅम वर गेलो. आम्हाला वाटलं कि आम्हाला तिथून खाली जायचा रास्ता मिळेल म्हणून आम्ही गाडी मधून उतरून समोर गेलो. पण आम्हाला तिथून खाली जायचा एकही रास्ता नाही सापडला.  एकदम मला बाजूला खाली जायचा रास्ता सापडला पण आम्हाला पाण्याजवळ जायचं होत आणि मला रोडवर जायचा रास्ता सापडला पण जेव्हा आम्ही त्या रस्त्यावर गेलो तेव्हा आम्हाला पूर्ण डॅम दिसला.  मी डॅम पहिल्यांदाच पहिला होता तो डॅम खूप उंचीवर  होता मी तिथून लवकरच आलो कारण मला भीती  होती कि मी तिथून पडून तर नाही जाणार.

मग आम्ही गाडीत बसलो आणि घराकडे निघालो. मी मधात खूप झोपलो  म्हणून मला माहित नाही कि गाडीमध्ये  काय झालं मला जाग जेव्हा जाग आली तेव्हा आम्ही उसाचा रस पिण्यासाठी गाडीच्या बाहेर निघालो. ऊसाचा रस पिऊन झाल्यावर मी गाडी बदलवली. त्यानंतर पण मी गाडीत  झोपलो. उठल्यावर मला माहित पडलं कि मी घराच्या खूप जवळ आहे आणि आम्ही घरी पोहोचलो. मला हा प्रवास खुपचं आवडला कारण याआधी मी कधी जंगल, किंवा धरण प्रत्यक्षात कधीच बघितले नव्हते. (१६ जानेवारी ते १७ जानेवारी २०२१)

Published by aaravraut

मैं अमरावती (महाराष्ट्र) से आरव राउत हूं। मै शुरू से ही एक प्रिंट-समृद्ध वातावरण में बड़ा हुआ, यही कारण था कि पढ़ने और लिखने की दिशा में मेरी प्रवृत्ति विकसित हुई। मेरी मातृभाषा मराठी है। हिंदी दूसरी भाषा है, जिसे मैंने दिल्ली में सुनना और अध्ययन करना शुरू किया जब मेरे पिता महाराष्ट्र से दिल्ली स्थानांतरित हो गए, मैं उस समय केवल 6 वर्ष का था। डायरी के ये पृष्ठ इस अर्थ में बहुत खास हैं क्योंकि यह मेरे द्वारा कक्षा 2 से ही लिखें गए है। मैं एजुकेशन मिरर का सबसे छोटा लेखक हूं जो एक ऑनलाइन शिक्षा संगठन है। जब मेरी दो डायरियाँ प्रकाशित हुईं, तो मैं दूसरी कक्षा में पढ़ रहा था। मैं हिंदी, मराठी के साथ ही अंग्रेजी भाषा में भी लिखता हूं। मुझे यात्रा करना, किताबें पढ़ना और नए विचारों पर काम करना पसंद है। घर पर, मुझे हमेशा अपने मन की बात लिखने की आजादी थी, मैं कभी भी उपदेशक बातें लिखने के लिए मजबूर नहीं था। यही कारण था कि मैंने जल्द ही पढ़ना और लिखना सीख लिया। बचपन में, मैंने लेखन की तकनीकी चीजों को समझा। मुझे याद है कि जब मैं कक्षा 1 (संत मैथ्यूज पब्लिक स्कूल, पश्चिम विहार, दिल्ली) में पढ़ रहा था, तब से मैंने लिखना शुरू किया। पहली बार मैंने 5 अप्रैल 2017 को लिखा था और तब से मैंने कई विषयों पर लिखा और मैंने अपने लेखन के सभी पृष्ठों को संजोकर रखा है। मेरे लेखन की यात्रा के दौरान, मुझे कभी भी किसी भी गलती के लिए बाधित नहीं किया गया था, मेरे माता-पिता चाहते थे कि मैं किसी भी व्याकरण में फंसे बिना लिखूं। इसी बात ने मुझे लिखने के लिए प्रोत्साहित किया क्योंकि मुझे पता था कि अगर कुछ गलत हुआ तो माँ / पिता कुछ नहीं कहेंगे। मैं किसी विषय के बारे में बहुत विस्तार के साथ एक पृष्ठ या कई पृष्ठ लिखता हूं।अगर मेरे द्वारा लिखे गए विषयों को देखा जाए, तो बहुत विविधता है।cc

13 thoughts on “शाहनूर धारगड जंगल सफारीचा माझा अनुभव

  1. Very nice Aarav! It was fun to read your beautiful diary. You explained all the things very well in your diary. When I was reading your diary, I felt like that I also came with you in Shahnoor Dhargad. You are my youngest favourite Writer. Proud of you Aarav! Keep it up!

    Liked by 1 person

  2. Pingback: gajendraraut
  3. Very nice Aarav! It was fun to read your beautiful diary. You explained all the things very well in your diary. When I was reading your diary, I felt like that I also came with you in Shahnoor Dhargad. You are my youngest favorite writer. Proud of you Aarav! Keep it up !

    Liked by 1 person

  4. Well done Aarav, much appreciated. This is none other than your Parents blessings on you that they inculcated habit of writing skill and self expression in you from very small age. I can associate my childhood with you where I use to write inland letters to my Mama who stayed in Dombivili (Maharashtra). He used to appreciate and respond back through inland letter and chain went on until many years. Similarly I used to exchange letters with my chilhood friend in Baroda. That time mobile were not invented so letters use to be natural medium of communication. Also when I grew up and during my 10th-12th standard, I started contributing in local English Newspaper at Indore, small column in their weekly digest.

    Thanks for making this nostalgic for me as I read your article.

    Best wishes and keep writing.
    love-

    Rahul Hood

    Anandvan Maharashtra Cooperative Group Housing Society, Paschim Vihar New Delhi 110063

    Like

    1. Thank you for your appreciation, I am glad that you read entire piece of writing and commented on it. This will really help me to write in future. I am inspired the way you started writing in for local English newspaper during your 10th – 12th standard.

      Like

Leave a comment